ज्या खेळाडूसोबत मैदानावरच झाले होते भांडण त्यानेच दिल्या शतकी खेळीच्या रायडूला शुभेच्छा

मुंबई। आज (29 ऑक्टोबर) भारत विरुद्ध विंडीज संघात सुरू असलेल्या चौथ्या वनडे सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट्स गमावत 377 धावा केल्या. यावेळी भारताचा सलामीवीर रोहित शर्माने त्याच्या वनडे कारकीर्दीतील 21वे शतक केले. त्याला चौथ्या क्रमांकावर आलेल्या अंबाती रायडूने उत्कृष्ठ साथ दिली.

यावेळी रायडूने त्याच्या कारकीर्दीतील 3रे शतक फक्त 80 चेंडूत पूर्ण केले. यामध्ये त्याने 8 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याने केलेल्या या शतकी खेळीचे भारताचा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने ट्विट करत अभिनंदन केले.

एकेकाळी रायडू आणि सिंग मैदानावर भिडले होते. त्याने ट्विट करत रायडूचे अभिनंदन केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

आयपीएलमध्ये (इंडियन प्रीमियर लीग) मुंबई इंडियन्सकडून खेळताना एका सामन्यात सिंग गोलदांजी करत असताना रायडूने केलेल्या क्षेत्ररक्षणावर त्याने नाराजी व्यक्त केली होती. रायडूनेही गप्प न बसता हरभजनसोबत बाचाबाची करण्यास सुरूवात केली. त्यावेळी हरभजनने दिलगीरी दाखवत रायडूला शांत केले होते.

विंडीज विरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करत बाद झालेल्या रायडूची सरासरी 123.45 होती. त्याने रोहित बरोबर 211 धावांची भागीदारी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

कोणत्याही संघाला न जमलेला पराक्रम भारतीय संघाने केला

केवळ एका धावेने हुकला धोनीचा जगातील सर्वात भारी विक्रम

पुढच्या सामन्यातील ती चूक धोनीसाठी पडू शकते कारकिर्दीतील सर्वात महाग

श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुना रणतुंगाला अटक