एकवेळ क्रिकेट गाजवणाऱ्या सर्वच दिग्गजांचे विक्रम रोहितने आरामात घातले खिशात

तिरुअनंतपुरम | आज (1 नोव्हेंबर) झालेल्या अखेरच्या आणि पाचव्या वनडे सामन्यात भारताने विंडीजवर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत पाच वनडे सामन्यांची मालिका 3-1 अशी खिशात घातली आहे.

नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीला आलेल्या विंडीज संघ 104 धावाच करू शकला. लक्ष्याचा पाठलाग करताना फलंदाजीला आलेल्या भारताच्या सलामीवीर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीने नाबाद प्रत्येकी 63 आणि 33 धावा केल्या.

यामुळे रोहितच्या यावर्षी 1000 वनडे धावा पूर्ण झाल्या आहेत. रोहितने सलामीला येताना तिसऱ्यांदा अशी कामगिरी केली आहे. याआधी त्याने 2013 आणि 2017ला सलामीला येताना वनडेमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या होत्या.

भारताचे दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली, तसेच सनथ जयसुर्या आणि तिलकरत्ने दिलशान यांनीच सलामीला येताना असा पराक्रम केला असून त्यांनी रोहितपेक्षा अधिक कॅलेंडर वर्षात अशी कामगिरी केली आहे.

यामुळे रोहित वनडेमध्ये सलामीला कॅलेंडर वर्षात 1000 धावा पूर्ण करणारा जगातील पाचवा फलंदाज ठरला आहे.

रोहितने त्याच्या नाबाद 63 धावसंख्येत 4 षटकार आणि 5 चौकार खेचले. यामुळे त्याचे वनडेमध्ये एकूण 200 षटकार पूर्ण झाले असून अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसराच भारतीय ठरला आहे. याआधी भारताकडून एमएस धोनीने वनडे इतिहासात 100 पेक्षा अधिक षटकार मारले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

हिटमॅन रोहित शर्माचा वन-डेत धमाका, केला असा काही कारनामा जो कुणालाही जमला नाही

बीसीसीआयच्या ‘या’ मोठ्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात