२०१९ विश्वचषकासाठी निवड झालेल्या खेळाडूंची अशी आहे कामगिरी

इंग्लंड आणि वेल्स येथे पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या आयसीसी विश्वचषकासाठी आज 15 जणांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे असणार आहे, तर उपकर्णधारपद रोहित शर्माकडे असणार आहे.

या भारतीय संघात विराट आणि रोहित सह शिखर धवन, केएल राहुल, दिनेश कार्तिक,केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, विजय शंकर, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांना संधी मिळाली आहे.

हा भारताचा अनुभवी यष्टीरक्षक एमएस धोनीचा चौथा विश्वचषक असून तो या संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याचबरोबर कर्णधार विराटचा हा तिसरा विश्वचषक असून रोहित, शिखर, जडेजा, भुवनेश्वर आणि शमी यांचा दुसरा विश्वचषक असणार आहे. त्याचबरोबर अन्य खेळाडू पहिल्यांदाच विश्वचषक खेळणार आहेत.

या विश्वचषकात खेळणाऱ्या खेळाडूंची कामगिरी – 

1. विराट कोहली (कर्णधार) –      

एकूण वनडे सामने –  227

धावा – 10843

सरासरी – 59.57

शतके/अर्धशतके – 41/49

सर्वोच्च कामगिरी – 183 धावा

विश्वचषकातील कामगिरी –

सामने – 17, धावा – 587, शतके/अर्धशतके – 2/1

2. रोहित शर्मा (उपकर्णधार) –

एकूण वनडे सामने –  206

धावा – 8010

सरासरी – 47.39

शतके/अर्धशतके – 22/41

सर्वोच्च कामगिरी – 264 धावा

विश्वचषकातील कामगिरी –

सामने – 8, धावा – 330, शतके/अर्धशतके – 1/2

3. शिखर धवन –

एकूण वनडे सामने –  128

धावा – 5355

सरासरी – 44.62

शतके/अर्धशतके – 16/27

सर्वोच्च कामगिरी – 143 धावा

विश्वचषकातील कामगिरी –

सामने – 8, धावा – 412, शतके/अर्धशतके – 2/1

4. केएल राहुल –

एकूण वनडे सामने –  14

धावा – 343

सरासरी – 34.30

शतके/अर्धशतके – 1/2

सर्वोच्च कामगिरी – 100* धावा

विश्वचषकातील कामगिरी – अजून एकही विश्वचषक खेळलेला नाही.

5. दिनेश कार्तिक –

एकूण वनडे सामने –  91

धावा – 1738

सरासरी – 31.03

शतके/अर्धशतके – 0/9

सर्वोच्च कामगिरी – 79 धावा

विश्वचषकातील कामगिरी – एकाही विश्वचषकात सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

6. केदार जाधव

एकूण वनडे सामने –  59

धावा – 1174

सरासरी – 43.48

शतके/अर्धशतके – 2/5

सर्वोच्च कामगिरी – 120 धावा

विश्वचषकातील कामगिरी – अजून एकही विश्वचषक खेळलेला नाही.

7. एमएस धोनी

एकूण वनडे सामने –  341

धावा – 10500

सरासरी – 50.72

शतके/अर्धशतके – 10/71

सर्वोच्च कामगिरी – 183* धावा

विश्वचषकातील कामगिरी –

सामने – 20, धावा – 507, शतके/अर्धशतके – 0/3

8. हार्दिक पंड्या –

एकूण वनडे सामने –  45

धावा – 731

सरासरी – 29.24

शतके/अर्धशतके – 0/4

विकेट – 44

सर्वोच्च कामगिरी – 83 धावा, 31 धावांत 3 विकेट्स

विश्वचषकातील कामगिरी – अजून एकही विश्वचषक खेळलेला नाही

9. विजय शंकर –

एकूण वनडे सामने –  9

धावा – 165

सरासरी – 33

शतके/अर्धशतके – 0/0

सर्वोच्च कामगिरी – 46 धावा

विश्वचषकातील कामगिरी – अजून एकही विश्वचषक खेळलेला नाही

10. रविंद्र जडेजा –

एकूण वनडे सामने –  151

धावा – 2035

सरासरी – 29.92

शतके/अर्धशतके – 0/10

विकेट – 174

सर्वोच्च कामगिरी – 87 धावा, 36 धावांत 5 विकेट्स

विश्वचषकातील कामगिरी – सामने 8, धावा- 57, विकेट्स – 9

11 . कुलदीप यादव- 

एकूण वनडे सामने –  44

विकेट्स – 87

एका डावात 5 विकेट्स – 1 वेळा

सर्वोच्च कामगिरी – 25 धावांत 6 विकेट्स

विश्वचषकातील कामगिरी – अजून एकही विश्वचषक खेळलेला नाही.

12. युजवेंद्र चहल –

एकूण वनडे सामने –  41

विकेट्स – 72

एका डावात 5 विकेट्स – 2 वेळा

सर्वोच्च कामगिरी – 42 धावांत 6 विकेट्स

विश्वचषकातील कामगिरी – अजून एकही विश्वचषक खेळलेला नाही.

13. जसप्रीत बुमराह –

एकूण वनडे सामने –  49

विकेट्स – 85

एका डावात 5 विकेट्स – 1 वेळा

सर्वोच्च कामगिरी – 27 धावांत 5 विकेट्स

विश्वचषकातील कामगिरी – अजून एकही विश्वचषक खेळलेला नाही.

14. भुवनेश्वर कुमार –

एकूण वनडे सामने –  105

विकेट्स – 118

एका डावात 5 विकेट्स – 1 वेळा

सर्वोच्च कामगिरी – 42 धावांत 5 विकेट्स

विश्वचषकातील कामगिरी – सामने 1, विकेट्स – 1

15. मोहम्मद शमी –

एकूण वनडे सामने –  63

विकेट्स – 113

एका डावात 5 विकेट्स – 0 वेळा, एका डावात 4 विकेट्स – 6 वेळा

सर्वोच्च कामगिरी – 35 धावांत 4 विकेट्स

विश्वचषकातील कामगिरी – सामने 7, विकेट्स – 17