कबड्डी- इंडिया ७ला वर्ल्ड ७ ठरले भारी, शानदार विजय मिळवत एकमेव सामना गाजवला

-संदेश महाडिक

प्रो कब्बडीचे ७ पर्व सुरु होण्यापूर्वी स्टार स्पोर्ट्सने इंडिया ७ (India 7) विरुद्ध वर्ल्ड ७ (World 7) अशा सामन्याचे आयोजन केले होते. भारताचे कबड्डीमध्ये असलेले वर्चस्व पाहून आपणच जिंकू असा बहुतेक कबड्डी प्रेमींचा अंदाज होता.

पण फझल अत्रचलीने द आईस मॅन अजय ठाकूरला बॅक होल्ड करून सामन्याचा श्री गणेशा केला. मध्यांतरापूर्वी सुरुवातीची ३ मिनीटं सोडता पवन शेरावतच्या जबरदस्त चढाईमुळे ६ गुणांची आघाडी मिळवण्यात इंडिया ७ यशस्वी झाले. दोन्ही संघाच्या डिफेंडरला काही विशेष खेळ दाखवता आला नाही.

मध्यांतरानंतर गुणफलक १५ मिनिटापर्यंत सतत १ ते २ गुणांच्या फरकाने चालत होता. वर्ल्ड ७ ला इंडिया ७ वर लोण देऊन लीड घेण्याची संधी चालून आली होती. पण अजय ठाकूरने सुरेख टो टचने फझलला बाद केले आणि पुढील चढाईमध्ये स्वतःची अँकल होल्डमधून सुटका करून २ गुण मिळवून पुन्हा ६ गुणांची आघाडी घेऊन इंडिया ७ स्थिरावले.

महाराष्ट्राचा उत्कुष्ट कोपरा रक्षक गिरीष इर्नाक संपूर्ण सामन्यात त्यांनी कोणतीही रिस्क न घेता खेळ केला. तसेच कोरिया स्टार रेडर जॅगँकून-लीला पकडण्याचा केलेल्या अयशस्वी प्रयत्नात २ गुण देऊन रिव्हीव्हदेखील गमावून बसले. यामुळेेआघाडी कमी होऊन ४ गुणांवर आली होती.

पवन शेरावतने सुपर १० पूर्ण करत पुन्हा इंडिया ७ ला ६ गुणांची आघाडी मिळवून दिली. ८ मिनिट शिल्लकअसताना फझल आणि लीने पवनची सुपर कॅच करून पुन्हा एकदा सामन्यात रंगत आणली आणि मोक्याच्या क्षणी अजय ठाकूरची पकड करून नबीबक्षने वर्ल्ड ७ च्या आशा जिवंत ठेवल्या. यावेळी इंडिया ७ चे दोन्ही प्रमुख रेडर बाद झाले होते.

६ मिनिटं उरली असताना वर्ल्ड ७ ने इमादला बाहेर काढून बांगलादेशच्या मसूद करीमला डू अँड डाय चढाईसाठी संघात घेतले. हाच सामन्याचा टर्निग पॉईंट ठरला. मसूदने सुरजितला बाद करून इंडिया ७ ला झटका दिला आणि नबीबक्षने पुन्हा एकादा आपल्या अष्टपैलु खेळ दाखवत दीपक हुडाची पकड करून सामन्यात चुरस निर्माण केली.

शेवटची ४ मिनिट असताना गुणफलक २७ -२६ असा झाला. रवीन्द्र पहलने आपल्या नेहमीच्या शैलीत उत्कृष्ट पकड करून सुपर कॅचचे २ गुण मिळवले व पवनला कव्हरमध्ये आणले. पण बोनससाठी प्रयत्न करत असताना फझलने त्याचा अँकल होल्ड करत वर्ल्ड ७ च्या आशा पल्लवित केल्या.

यावेळी ३ च्या कव्हरमध्ये नबीबक्षने रवींद्र पहलला चकवून १ गुण झोळीत टाकला. चढाईसाठी मनिंदरला संघात घेतले पण त्यांनी एम्प्टी रेड करून निराशा केली. पुन्हा खेळाडू बदलून नितेश कुमारला संघात घेतले पण मोहम्मद नबीबक्षची पकड करण्यात तो अपयशी ठरला आणि इंडिया ७ वर लोण नामुष्की ओढवली. यामुळे वर्ल्ड ७ कडे ३०- ३२ अशी २ गुणांची आघाडी आली.

पवनने चपळाईने १ गुण मिळवत आघाडी कमी केली पण पुढील रेड मध्ये जॅगँकून-लीने पवनचा अँकल होल्ड करून फझलच्या बॅक होल्डच्या साथीने २ गुणांची आघाडी कायम केली. जेव्हा ३० सेकंदापेक्षा कमी वेळ उरला तेव्हा वर्ल्ड ७ चा १ गुणांनी विजय होणार हे निश्चित झाले.

इंडिया ७ चे सततचे बद्दल, कव्हर मधील प्रमुख खेळाडूंचा निराशजनक प्रदर्शन सुरू असताना प्रेक्षक उत्साहाने सामना पहात होतो परंतु कव्हरमधील खेळाडूंचा इंडिया ७ च्या नावाखाली खेळताना तितका उत्साह दिसला नाही.

यावेळी वर्ल्ड ७ मधील मोहम्मद नबीबक्ष प्रो कब्बडी लीगच्या त्याच्या पहिल्याच हंगामात महागडा परदेशी खेळाडू का आहे, हे सिद्ध केले. त्याच्या अष्टपैलु खेळाने, फझलच्या अप्रतिम पकड आणि कोरियन बोनस किंग जॅगँकून-ली चढायांच्या जोरावर एक गुणांनी का होईनावर्ल्ड ७ ला विजय मिळवून दिला.

परदेशी खेळाडूंच्या खेळातील सुधारणा पाहून खेळातील भारताची यापुढील वाटचाल नक्कीच खडतर आहे याचा मात्र अंदाज आला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

स्टोक्स खेळत होता इंग्लंडकडून पण वडील देत होते न्यूझीलंडला पाठिंबा

ऋतुराज गायकवाड, नवदीप सैनीची वेस्टइंडीज विरुद्ध शानदार कामगिरी

विंडीज दौऱ्यासाठी या दिवशी होणार टीम इंडियाची निवड; धोनीच्या भविष्याबाबत सस्पेन्स कायम