दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारत ‘अ’ संघाची घोषणा

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी आज सकाळी भारतीय अ संघाची आज निवड करण्यात आली. भारतीय संघ या दौऱ्यात तिरंगी मालिका खेळणार असून त्यात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघाचा समावेश आहे तर ४ दिवसीय दोन सामने यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे.
तिरंगी लढतीसाठीचा संघ
मनदीप सिंग, श्रेयस अय्यर, संजू सॅम्सन, मनीष पांडे (कर्णधार ), दीपक हुडा, करून नायर, कृणाल पंड्या, रिषभ पंत (यष्टिरक्षक), विजय शंकर, अक्सर पटेल, युझवेन्द्र चहल, जयंत यादव, बॅसिल त्रिपाठी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, सिद्दार्थ कौल.
कसोटीसाठी संघ
पिके पांचल, अभिनव मुकुंद, श्रेयस अय्यर, अंकित बावणे, करून नायर (कर्णधार), सुदीप चटर्जी, ईशान किशन( यष्टीरक्षक ), हनुमा विहारी, जयंत यादव, शाहबाझ नदीम, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर, अंकित चौधरी, अंकित राजपूत