वकार युनुसने केलेल्या त्या ट्विटने जिंकली भारत-पाकिस्तान चाहत्यांची मने

पाकिस्तानचा माजी वेगवान आणि कर्णधार गोलंदाज वकार युनुसने केलेल्या एका ट्विटमुळे त्याने भारत आणि पाकिस्तान या प्रतिस्पर्धी देशांच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत.

त्याने ट्विटरवर त्याचा आणि भारताची जर्सी परिधान केलेल्या एका छोट्या मुलाचा फोटो शेअर केला आहे. त्याचबरोबर त्याने या फोटोला कॅप्शन दिले आहे की ” क्रिकेटला कोणतीही सीमा नाही”

युनुसच्या या ट्विटचे अनेक चाहत्यांनी कौतूक केले आहे. तसेच त्याच्या ट्विटला आत्तापर्यंत 521 रिट्विट आले आहेत.

2014 मध्ये या दोन देशात एमओयू करार झाला होता. ज्यानुसार हे दोन देशएकमेकांविरुद्ध द्विपयक्षिय मालिका खेळतील. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हा करार पाळावा याची भारतीय क्रिकेट बोर्डाकडे मागणी करत आहेत. परंतू भारतीय क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे. यासाठी बीसीसीआयने सरकारची मंजुरी नसल्याचे कारण दिले आहे. 

सध्या भारत आणि पाकिस्तानया दोन्ही देशात असलेल्या राजकीय तणावामुळे 2012 पासून एकदाही द्विपक्षिय मालिका झालेली नाही. हे दोन देश सध्या फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळतात.