भारताला पाकिस्तानचा हा विक्रम मोडायची संधी

मुंबई । भारत विरुद्ध न्यूजीलँड वनडे मालिका उद्यापासून सुरु होत आहे. या दौऱ्यात न्यूजीलँड संघ भारताविरुद्ध ३ वनडे आणि ३ टी२० मालिका खेळणार आहे. या मालिकेत भारतीय संघाला पुन्हा एक खास विक्रम करायची संधी आहे.

आजपर्यंत भारतीय संघ कसोटी, वनडे आणि टी२० सामने मिळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६६६ सामने जिंकला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला टी२० सामना जिंकून भारताने पाकिस्तान संघाचा विक्रम मागे टाकला होता.

परंतु श्रीलंका संघाविरुद्ध सलग ४ सामने जिंकून पाकिस्तान संघाने भारतीय संघाला पुन्हा मागे टाकत या यादीत तिसरा क्रमांक पटकावला. सध्या पाकिस्तान संघाच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ६६९ विजय आहेत. तर पाकिस्तान संघाचे श्रीलंका संघाविरुद्ध अजून ४ सामने बाकी आहेत.

भारत जर न्यूजीलँड विरुद्धची मालिका जिंकला तर भारतीय संघ पुन्हा पाकिस्तान संघाला मागे या क्रमवारीत तिसऱ्या स्थानी येऊ शकतो.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे संघ
ऑस्ट्रेलिया, विजय- ९८१, एकूण सामने- १८०४
इंग्लंड, विजय- ७४५, एकूण सामने- १७८३
पाकिस्तान, विजय- ६६९, एकूण सामने- १४१२
भारत, विजय- ६६६, एकूण सामने- १५२७