या वनडे सामन्यासाठी आहेत सर्वात स्वस्त तिकिटे

इंदोर । मध्य प्रदेश क्रिकेट असोशिएशनने इंदोर येथे होणाऱ्या सामन्यासाठी तिकिटांची किंमत ही २५० रुपयांपासून ५,१२० रुपयांपर्यंत ठेवली आहेत. २४ सप्टेंबर रोजी येथील होळकर मैदानावर तिसरा वनडे सामना होत आहे.

तिकिटांच्या किमती ह्या जीएसटीचा समावेश करूनच निश्चित केलेल्या आहेत. तब्बल २० हजार तिकिटे ऑनलाइन आणि काउंटरच्या माध्यमातून विकली जाणार आहेत. याबद्दलची तारीख असोशिएशन लवकरच घोषित करणार आहे. या मैदानाची क्षमता २८,५०० प्रेक्षक बसण्याची आहे.

महिला प्रेक्षक आणि दिव्यांग क्रिकेटप्रेमींसाठी यावेळी खास सुविधा करण्यात येणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान वनडे मालिका येत्या १७ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. यात ५ वनडे सामने आणि ३ टी२० सामने होणार आहे.

या वनडे सामन्यासाठी आहेत सर्वात महाग तिकिटे:
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही मर्यादित षटकांची मालिका येत्या १७ सप्टेंबरपासून चेन्नई वनडे सामन्याने सुरु होणार आहे. या सामन्यासाठी तिकिटांचे दर हे १२०० रुपयांपासून सुरु होणार आहे.

१० सप्टेंबरपासून पहिल्या सामन्यासाठी तिकीटविक्री सुरु झाली असून यात १२००, २४००, ४८०० आणि ८००० रुपयांची तिकिटे असल्याची घोषणा तामिळनाडू क्रिकेट असोशिएशनने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली.

पाहुण्यांसाठीच्या खास बॉक्सचे तिकीट हे १२ हजार रुपये तर पॅव्हिलियन टेरेसचे तिकीट ८००० रुपये असणार आहे. प्रसिद्धी पत्रकात सांगितल्याप्रमाणे चाहते www.bookmyshow.com वेबसाइटवरूनही तिकीट खरेदी करू शकतात.