भारत ब समोर आॅस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, जिंकले चौरंगी मालिकेचे विजेतेपद

बंगळूरु। बुधवारी, 29 आॅगस्टला भारत ब विरुद्ध आॅस्ट्रेलिया अ संघात चौरंगी मालिकेतील अंतिम सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 9 विकेटने विजय मिळवत मालिकेचे विजेतेपदही जिंकले.

या सामन्यात आॅस्ट्रेलिया अ संघाने भारत ब संघासमोर विजयासाठी 226 धावांचे आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना पांडेने शुभमन गिलबरोबर दुसऱ्या विकेटसाठी नाबाद 120 धावांची भागिदारी रचली. गिलने या सामन्यात 84 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीने नाबाद 66 धावा केल्या.

तर सलामीवीर मयंक अगरवालने 67 चेंडूत 69 धावांची खेळी केली. यात त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले. तसेच इशान किशन दुखापतग्रस्त झाल्याने 13 धावांवर असताना मैदानाबाहेर गेला. भारताने हे आव्हान 36.3 षटकात पूर्ण केले.

तत्पूर्वी भारतीय गोलंदाजांनी आॅस्ट्रेलियाचा डाव षटकातच 225 धावांवर संपुष्टात आणला होता. भारताकडून श्रेयश गोपाळने 3, दिपक हुडा, नवदीप सैनी आणि सिद्धार्थ कौलने प्रत्येकी 2 आणि जलज सक्सेनाने 1 विकेट घेतली.

आॅस्ट्रेलियाकडून डॉर्सी शॉर्ट आणि अॅलेक्स कारेने अर्धशतक केले. शॉर्टने 77 चेंडूत 72 धावा आणि कारेने 56 चेंडूत 53 धावा केल्या.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

 एशियन गेम्स: भारताला मिश्र रिलेत ऐतिहासिक रौप्यपदक

 …तुम्ही क्रिकेटमधील धावांप्रमाणे हाॅकीत गोल करता!!!

भारत विरुद्ध इंग्लंड चौथ्या कसोटीत या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष…