भारतीय हॉकी संघाचा मोठा पराक्रम, आशिया कपचा तिसऱ्यांदा विजेता

मलेशिया संघाला २-१ असे पराभूत करत अनेक विक्रमांना घातली गवसणी

ढाका: येथे सुरु असलेल्या हॉकी आशिया कपच्या अंतिम फेरीत आज भारतीय पुरुष हॉकी संघाने मलेशिया संघाचा २-१ असा पराभव करत भारताने तिसऱ्यांदा आशिया कपचे विजेतेपद पटकावले.

भारताकडून रामनदीप सिंग (३’) आणि ललित उपाध्याय (२९’) यांनी प्रत्येकी एक गोल करत विजयात मोलाची कामगिरी बजावली. मलेशियासाठी शहरील सबाहने (५०’) गोल केला.

पहिलया सत्रात भारतीय खेळाडूंनी आश्वासक सुरुवात केली. पहिल्या सत्राच्या तिसऱ्याच मिनिटाला रामनदीप सिंग आणि एस.व्ही.सुनील यांनी चाल रचली.

यात रामनदीप याने गोल करत भारतीय संघाचे खाते उघडले आणि भारताने १-० अशी आघाडी मिळवली. अंतिम सामन्यात केलेल्या पहिल्या गोल मुळे भारतीय संघाचे मनोबल वाढले. त्यामुले भारतीय संघाचा पहिल्या सत्रातील खेळ खुप उंचावला गेला.

दुसऱ्या सत्रात देखील भारतीय खेळाडूंचा दबदबा राहिला. भारताच्या दमदार डिफेन्सपुढे मलेशियन आघाडीवर फारशी चमकदार कामगिरी करू शकले आंही. तर देखी त्यांनी वेळोवेळी भारतीय संघासमोर प्रश्न उपस्थित केले. २९ व्या मिनिटाला भारतीय संघाच्या ललित उपाध्याय याने उत्तम डिफ्लेक्शन देत भारतीय संघाची आघाडी २-० अशी केली.

तिसऱ्या आणि चौथ्या सत्रात देखील भारतीय खेळाडूंचा दबदबा राहिला. परंतु ५० व्या मिनिटाला मलेशियाच्या खेळाडूंना भारतीय बचाव भेदण्यात यश आले.

मलेशियाच्या शहरील सबाह याने गोल मैदानी गोल केला. या गोलसह मलेशियन सामन्यात परतण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि वेळोवेळी भारतीय बचाफळीसमोर प्रश्न उपस्थित केले. परंतु भारतीय संघाने त्यांना संधी न देता तिसऱ्यांदा आशिया कप वर आपले नाव कोरले.

यदाकदाचित आपणास माहिती नसेल तर –
# या स्पर्धेत भारतीय संघाने एकही सामना गमावला नाही.

# आजच्या विजयासह भारत आशिया कप सर्वाधिक वेळा जिंकण्याच्या यादीत साऊथ कोरिया (४) नंतर दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.

# भारताने आशिया कप १० वर्षानंतर पुन्हा जिंकला.

# यापूर्वी भारताने २००३ आणि २००७ साली आशिया कप जिंकला होता.

# २०११ साली भारत कोरिया विरुद्ध पराभूत होऊन उप-विजेता संघ होता.