Breaking: पाकिस्तानला पराभूत करत भारताने जिंकला तब्बल ५व्यांदा क्रिकेट विश्वचषक

गतविजेत्या भारतीय संघाने अंधांच्या क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तान संघाला २ विकेट्सने पराभूत करत सलग दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. ही स्पर्धा युएईमधील शारजा क्रिकेट स्टेडिअमवर झाला.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ३०८ धावा केल्या.

भारतीय संघासमोर ३०९ धावांचे मोठे लक्ष असतानाही चांगली फलंदाजी करत भारताने हा विजय मिळवला.

पाकिस्तानकडून बदर मुनीरने ५७ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर रियासत खान आणि कर्णधार नासर अलीने अनुक्रमे ४८ आणि ४७ धावा केल्या. यांच्या जोरावरच पाकिस्तानने ३०० धावांचा टप्पा पार केला.

३०९ धावांचे लक्ष घेऊन मैदानात आलेलया भारतीय संघाने ८ विकेट्स गमावत ३८.१ षटकांत हे लक्ष पार केले.

हा अंधांसाठीचा ५वा क्रिकेट विश्वचषक होता आणि भारतीय संघाने हा विश्वचषक आजपर्यंत प्रत्येक वेळा जिंकला आहे.