भारतीय संघाने ३०० किंवा त्यापेक्षा जास्त धावांचा केला एक खास विक्रम

0 267

मोहाली। येथील पंजाब क्रिकेट असोसिएशन आय एस बिंद्रा स्टडीयमवर सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका संघातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद ३९२ धावा केल्या आहेत. भारताने आत्तापर्यंत वनडेत शंभर वेळा ३०० धावांचा टप्पा पार केला आहे. असे करणारा भारत पहिला संघ ठरला आहे.

आज भारताकडून सलामीवीर रोहित शर्माने वनडेत तिसऱ्यांदा द्विशतक केले आहे. त्याच्याबरोबर आज श्रेयश अय्यर आणि शिखर धवनने अर्धशतके पूर्ण केली आहेत. या तिघांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने ३९७ धावांचा टप्पा पार केला.

भारत आणि श्रीलंका संघात ३ सामन्यांची ही वनडे मालिका होणार आहे. पहिला सामना श्रीलंका संघाने जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

वनडेत सर्वाधिक वेळा ३०० धावांचा टप्पा पार करणारे संघ:

-१०० भारत
-९६ ऑस्ट्रेलिया
-७९ दक्षिण आफ्रिका
-६९ पाकिस्तान
-६६ श्रीलंका
-५८ इंग्लंड
-५२ न्यूझीलंड
-३८ विंडीज
-२५ झिम्बाबे
-११ बांग्लादेश

Comments
Loading...
%d bloggers like this: