त्यांना आधी तुमची आवडती महिला क्रिकेटपटू कोण हे विचारा – मिताली राज

भारतीय महिला संघाने काल श्रीलंका संघाचा सराव सामन्यात पराभव करून आयसीसी विश्वचषक स्पर्धेला विजयी सुरुवात केली. भारतीय संघाने कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वाखाली हा विजय मिळविला. त्यांनतर झालेल्या पत्रकार परिषदेत जेव्हा मिताली राजला प्रश्न करण्यात आला की तुझा आवडता क्रिकेटपटू कोण?

यावर मिताली राजने क्षणाचाही विलंब न करता त्या पत्रकाराला प्रतिप्रश्न केला, “आधी तुम्ही त्या क्रिकेटपटूंना विचारा त्यांची आवडती महिला क्रिकेटपटू कोण? ”
पुढे मिताली असही म्हटली की, ” नेहमी पुरुषच असे प्रश्न मुलींना विचारतात का तुम्ही कधी पुरुष खेळाडूला तुझी आवडती महिला क्रिकेटपटू कोण आहे असंही विचारलय? नसेल तर आधी कृपया ते विचारा आणि मग मला हा प्रश्न करा.”

महिला क्रिकेटपटूंना चाहते तसेच अन्य घटकांकडून मिळणाऱ्या दुजाभावाबद्दल मिताली राज आजकाल बऱ्याच वेळा रोखठोक बोलते.


महा स्पोर्ट्स भूमिका:
कोणत्याही खेळाकडे फक्त खेळ म्हणून पहिले पाहिजे. त्यात पुरुष खेळाडू किंवा महिला खेळाडू असा भेदभाव होता कामा नये. ग्रँडस्लॅम स्पर्धामध्येही गेल्या काही वर्षांपासून पुरुष आणि महिला खेळाडूंचे बक्षिस सारखे केले आहे. मग अन्य खेळांत हा भेदभाव का? आज भारताच्या महिला बॅडमिंटनपटू अतिशय चांगली कामगिरी करतात. त्यामुळे त्या खेळात भारताच्या महिलांचं वर्चस्व आहे. जरी असं असल तरी पुरुष खेळाडूंना सुद्धा समान संधी आहे. मग अन्य खेळात असं महिलांबद्दल का होत नाही.

प्रश्न विचारताना आपण विराट किंवा धोनीला विचारतो का की तुझी आवडती महिला क्रिकेटपटू कोण? मग मिताली राजला हा प्रश्न का? ज्या दिवशी आपण असे प्रश्न विराट किंवा अन्य भारतीय खेळाडूंना विचारू त्याच वेळी आपण हा प्रश्न भारतीय महिला खेळाडूंना विचारू शकतो.