आयसीसी टी20 क्रमवारीत भारताचे स्थान वधारले; आॅस्ट्रेलियाला टाकले मागे

भारतीय संघाने 29 जूनला आयर्लंड विरुद्ध दुसऱ्या टी20 सामन्यात 143 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने 2 सामन्यांची टी20 मालिकाही 2-0 अशा फरकाने जिंकली.

या मालिकेनंतर आयसीसीच्या टी20 क्रमवारीत संघांच्या स्थानात बदल झाले. भारतीय संघाची या क्रमवारीत एका स्थानाने प्रगती झाली आहे. भारताने आॅस्ट्रेलियाला मागे टाकत आयसीसी टी20 क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले आहे.

27 जूनला पार पडलेल्या इंग्लंड विरुद्ध आॅस्ट्रेलिया यांच्यातील एकमेव टी20 सामन्यात आॅस्ट्रेलियाला पराभव स्विकारावा लागला होता. त्यामुळे त्याचे गुण 126 वरुन 122 झाले. गुणांमध्ये झालेल्या घसरणामुळे आॅस्ट्रेलियाला त्यांचे क्रमवारीतील दुसरे स्थान गमवावे लागले.

सध्याच्या आयसीसी टी20 क्रमवारीत पाकिस्तान 131 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तसेच भारत 123 गुणांसह दुसऱ्या आणि आॅस्ट्रेलिया 122 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.

भारतीय संघ 3 जुलैपासून इंग्लंड विरुद्ध 3 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला गुण वाढवून आपले स्थान पक्के करण्याचे आव्हान आहे.

तसेच 1 जूलैपासून आॅस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातही तिरंगी टी20 मालिका सुरु होणार आहे. त्यामुळे या मालिकेतून आॅस्ट्रेलियाचा पुन्हा एकदा आपले स्थान परत मिळवण्याचा तर पाकिस्तानचा अव्वल स्थान कायम राखण्याचा प्रयत्न असेल.

महत्त्वाच्या बातम्या:

Video: एमएस धोनीच्या चिमुकलीचा हार्दिक पंड्याला जोरदार पाठिंबा

भारतीय खेळडूंनीच विराट कोहलीला अडकवले मोठ्या संकटात

विराट कोहलीच्या बाबतीत असे दुसऱ्यांदाच घडले!