तिसरी कसोटी: कोहलीने सलग तिसऱ्यांदा नाणेफेक जिंकली

पल्लेकेल: भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून अपेक्षेप्रमाणे फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलग तिसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकली आहे.

येथे होणाऱ्या कसोटी सामन्यात बंदी घालण्यात आलेल्या रवींद्र जडेजाच्या जागी चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवला संधी देण्यात आली आहे. हा सलग २९ वा कसोटी सामना आहे ज्यात विराट कोहलीने प्रत्येक वेळी संघात एकतरी बदल केला आहे. यापूर्वी हा विक्रम सौरव गांगुलीच्या नावावर होता.

भारत तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० असा विजयी आघाडीवर आहे. हा सामना जिंकून भारत परदेशात प्रथमच ३ सामन्यात निर्भेळ यश मिळविण्यासाठी उत्सुक आहे.