भारत चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार!

भारतीय क्रिकेट संघाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सहभागाबद्दल सुरु असलेला घोळ अखेर संपुष्ठात येऊन भारतीय संघ २०१७ ला इंग्लंड या स्पर्धेत भाग घेणार आहे.

आज बीसीसीआयची विशेष येथे पार पडली त्यात हा निर्णय घेण्यात आला. पुढील ४८ तासात भारतीय संघाची घोषणा होणार आहे.

बीसीसीआयच्या आयसीसीच्या उत्पन्नामधील वादामुळे भारतीय क्रिकेट संघाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.
८ देशांच्या या स्पर्धेत भारताच्या गटात आशियायी पाकिस्तान व श्रीलंका तर आफ्रिकन देशात दक्षिण आफ्रिका आहे. भारताचा पहिला सामना ४ जून रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होत आहे.