विराट कोहली उबर इंडियाचा पहिला ब्रँड अँबेसेडर

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या अनेक यशाची शिखरे पार करत आहे. त्यामुळे त्याला अनेक चांगल्या जाहिरातींच्या ऑफर्सही मिळाल्या आहेत. तसेच तो अनेक ब्रॅण्ड्सचा ब्रँड अँबेसेडरही आहे. आता विराट उबर या कॅबची सेवा देणाऱ्या कंपनीचा ब्रँड अँबेसेडर झाला आहे.

याबद्दल विराट म्हणाला, ” एक क्रिकेटपटू म्हणून मला खूप प्रवास करावा लागतो. मी वयक्तिकदृष्ट्या उबरच्या बुकिंगवर खूप चांगला अनुभव घेतला आहे. टेक्नॉलॉजीचा चांगला उपयोग करून कंपनी शहरात क्रांतिकारी बदल घडवत आहे आणि लाखो लोकांना आर्थिकदृष्ट्या संधी देऊन सशक्त बनवत आहे.मी या कंपनीशी जोडला गेल्याने खूप उत्साहित आहे.”

तसेच दक्षिण आफ्रिका आणि भारतातील उबरचे अध्यक्ष अमित जैन म्हणाले, विराटला उबर इंडियाचा ब्रँड अँबेसेडर बनवल्याने ते खूप उत्साहित आहेत. त्यांनी त्याच्या कामगिरीचे कौतुकही केले आहे.

सध्या उबरची मुंबई- दिल्ली सारख्या मोठ्या शहरांमध्ये चांगलीच क्रेझ वाढत आहे. लोक उबर कॅबचा नियमित वापर करत आहेत. त्यामुळे विराटचा हा करार उबरसाठी आणखी फायद्याचा ठरणार आहे.

विराटला सध्या श्रीलंकेत चालू असलेल्या निदाहास ट्रॉफीसाठी विश्रांती दिली आहे. त्यामुळे तो सुट्यांची मजा घेत आहे.