भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक

वेस्ट इंडिज दौऱ्यांनंतर १५दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याला सुरुवात होत असून हा दौरा २६ जुलै ते ८ सप्टेंबर या कालावधीत खेळवला जाईल.

दोन महिन्यांच्या या दौऱ्यात ३ कसोटी, ५ एकदिवसीय आणि एक टी-२० सामना खेळणार आहे. २६ जुलै रोजी दौऱ्यातील पहिला कसोटी सामना गॅले येथे खेळवला जाणार आहे.

संपूर्ण दौऱ्याचे वेळापत्रक
पहिला कसोटी सामना २६ ते ३० जुलै गॅले
दुसरा कसोटी सामना ३ ते ७ ऑगस्ट कोलंबो
तिसरा कसोटी सामना १२ ते १६ ऑगस्ट कॅंडी

पहिला एकदिवसीय सामना २० ऑगस्ट डॅबुल्ला
दुसरा एकदिवसीय सामना २४ ऑगस्ट कॅंडी
तिसरा एकदिवसीय सामना २७ ऑगस्ट कॅंडी
चौथा एकदिवसीय सामना ३१ ऑगस्ट कोलंबो
पाचवा एकदिवसीय सामना ३ सप्टेंबर कोलंबो

एकमेव टी-२० सामना ६ सप्टेंबर कोलंबो