भारतीय क्रिकेट इतिहासात प्रथमच क्रमवारीत घडली अविश्वसनीय गोष्ट

रविवारी भारतीय संघाने जेव्हा दुसरा कसोटी सामना जिंकला तेव्हा भारतीय संघाचे आयसीसी वनडे क्रमवारीत १२१ गुण झाले. याबरोबर भारतीय संघाचे कसोटी, वनडे आणि टी२० अशा तिन्ही प्रकारात १२१ गुण झाले आहे.

क्रिकेटच्या संपूर्ण इतिहासात भारतीय संघाने तिन्ही प्रकारात सारखेच गुण घेण्याची ही पहिलीच वेळ होती. परंतु तिन्ही प्रकारात जरी सारखेच गुण असले तरी क्रमवारीत मात्र संघ तिन्ही प्रकारात वेगवेगळया स्थानावर आहे.

भारतीय संघ कसोटीत पहिल्या, वनडेत पहिल्या आणि टी२०मध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. ही क्रमवारी भारतीय संघाने दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यानंतरची आहे.