इंग्लंडला पराभूत करत टीम इंडिया ठरली चॅम्पियन!

2019 फिजिकल डिसऍबिलिटी(शारीरिक अपंगत्व) वर्ल्ड क्रिकेट सिरिज स्पर्धेतील अंतिम सामना मंगळवारी पार पडला. इंग्लंडमध्ये झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा 36 धावांनी पराभव करत विजेतेपद मिळवले आहे.

20-20 षटकांचा झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 180 धावा केल्या. भारताकडून रविंद्र सांतेने 34 चेंडूत 53 धावांची आक्रमक खेळी केली. या खेळीत त्याने 2 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याला सुगणेश महेंद्रनने 33 धावा करत चांगली साथ दिली.

त्याआधी कर्णधार विक्रांत केणी आणि कुणाल फणसे यांनी दुसऱ्या विकेटसाठी 46 धावांची भागीदारी करत भारताला चांगली सुरुवात दिली होती.

त्यानंतर 181 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाला भारतीय गोलंदाजांनी 144 धावांवर रोखण्यात यश मिळवले. इंग्लंडकडून सलामीवीर फलंदाज अंगस ब्रोने 32 चेंडूत 44 धावांची चांगली खेळी केली. इंग्लंडच्या डावातील ही सर्वोच्च धावांची खेळी ठरली. भारताकडून फणसे आणि सनी गोयतने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

या विजयानंतर बीसीसीआयने भारतीय संघाचा फोटो ट्विटरवर शेअर करत अभिनंदन केले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

या दिवशी होणार टीम इंडियासाठी मुख्य प्रशिक्षकाची घोषणा

विराट कोहलीची माफी मागत डेल स्टेनने केली निवड समीतीवर टीका

भारत दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिका संघाची झाली घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी