भारत करणार प्रथम फलंदाजी, वाचा भारताने कोणत्या सलामीवीराला दिली संधी?

भारतीय क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून दुसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजाराचा हा ५०वा कसोटी सामना आहे.

भारताने सलामीवीर म्हणून केएल राहुलच्या बरोबर शिखर धवनला संधी दिली आहे. भारतीय संघातील एकमेव बदल म्हणजे अभिनव मुकुंदच्या जागी केएल राहुलला सलामीवीर म्हणून संधी देण्यात आली आहे.

श्रीलंकेने संघात तीन बदल केले आहेत. मलिंदा पुष्पाकुमारला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली आहे. धनंजय डी सिल्वा आणि दिनेश चंडिमल यांनी कमबॅक केले आहे. या सामन्यात दिनेश चंडिमल श्रीलंकेच नेतृत्व करेल.

भारत या सामन्यात विजय मिळवून विजयी आघडी घेण्यासाठी उत्सुक आहे.

भारतीय संघ: केएल राहुल, शिखर धवन, विराट कोहली, आर अश्विन, वृद्धिमान सहा, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, उमेश यादव