वनडे क्रमवारीतही भारताला अव्वल स्थान मिळवण्याची संधी !

0 191

धरमशाला। उद्या पासून भारत विरुद्ध श्रीलंका संघातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत भारताला आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान होण्याची संधी आहे.

सध्या या क्रमवारीत दक्षिण आफ्रिका अव्वल क्रमांकावर आहे. तर भारत दुसऱ्या स्थानी आहे. या दोन्ही संघात फक्त १ गुणांचा फरक आहे. त्यामुळे जर भारताने श्रीलंका विरुद्ध होणारी वनडे मालिका ३-० ने जिंकली तर भारत दक्षिण आफ्रिकेला पिछाडीवर टाकेल व अव्वल स्थान मिळवेल.

भारतचे सध्या १२० गुण आहेत. भारताने जर उद्या धरमशाला येथे होणारा पहिला वनडे सामना जिंकल्यास ते एक गुण मिळवून दक्षिण आफ्रिकेची बरोबरी करतील परंतु या बरोबरच भारताला जर ही आघाडी टिकवून ठेवायची असल्यास १३ डिसेंबर आणि १७ डिसेंबरला अनुक्रमे मोहाली आणि विशाखापट्टणमला होणाऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेतही विजय मिळवावा लागेल.

त्याचबरोबर जर भारताने ही वनडे मालिका २-१ ने जरी जिंकली तरी त्यांना ११९ गुणांवर घसरावे लागेल.

तसेच श्रीलंका जरी ३-० ने पराभूत झाली तरी ८३ गुणांवर कायम राहील पण जर त्यांनी या मालिकेत ३-० असा विजय मिळवल्यास ते ८७ गुणांवर पोहोचतील. सध्या श्रीलंका आठव्या स्थानी आहे.

Comments
Loading...
%d bloggers like this: