दिग्गज माजी गोलंदाजाची इंशांत शर्मावर स्तुतीसुमने

भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माचा हा 4 था इंग्लंड दौरा आहे. इशांते  प्रत्येक इंग्लंड दौऱ्यात भारतासाठी चमकदार कामगिरी केली आहे.

सध्या भारतीय संघातील गोलंदाजापैकी इशांत सर्वात जास्त अनुभवी गोलंदाज आहे आणि तो भारताच्या वेगवान गोलंदाजांचे जबाबदारी घेऊन नेतृत्व करतोय. असे म्हणत भारताचा माजी गोलंदाज अशीष नेहराने इशांतच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

“सध्या भारताकडे  6 ते 7 सर्वोत्तम गोलंदाज आहेत. यामध्ये इशांत स्वत: चांगली कामगिरी करत या युवा गोलंदाजांचे नेतृत्व करतोय हे पाहून मला आनंद झाला अाहे. इशांतने प्रत्येकवेळी इंग्लंडमध्ये दमदार कामगिरी केली आहे. तसेच त्याचा इंग्लंडमधील कौंटी खेळण्याचा निर्णय योग्य होता. कौंटीच्या अनुभवाचा लाभ इशांत पहिल्या सामन्यात झालेला आपण पाहिलेच असेल.” असे नेहरा म्हणाला.

इंग्लंड विरुद्ध भारत संघात लॉर्ड्सवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने तिसऱ्या दिवसाखेर 6 बाद 357 धावा केल्या आहेत.

त्यामुळे इंग्लंडने पहिल्या डावात 250 धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडकडून या डावात अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सने शतक तर जॉनी बेअरस्टोने अर्धशतक केले आहे.

भारताचा पहिला डाव दुसऱ्या दिवसाखेर 107 धावांवर संपूष्टात अाला होता.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

-हार्दिक पंड्या अडकणार आयसीसीच्या जाळ्यात!

-लॉर्ड्स कसोटी- तिसऱ्या दिवशीच्या लंचला टीम इंडियाने मारला बीफ वर ताव, चाहत्यांनी सुनावले खडे बोल