माजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी

सध्या इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या कसोटी मालिकेत सलामीवीर अपयशी ठरत असल्यामुळे मयांक अग्रवाल आणि पृथ्वी शाॅ यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. शिखर धवन, मुरली विजय आणि केएल राहुल हे या मालिकेत सपशेल अपयशी ठरले आहेत.

केएल राहुलने दोन सामन्यात ३५, मुरली विजयने दोन सामन्यात २६ तर शिखर धवनने पहिल्या सामन्यात ३९ धावा केल्या आहेत.

सोमवारी माजी भारतीय अष्टपैलू अजित आगरकरने यावर भाष्य केले आहे. “देशांतर्गत क्रिकेटमध्ये पृथ्वीने जोरदार कामगिरी केली आहे. त्याने १४ सामन्यात ५६.४७च्या सरासरीने ७१८ धावा केल्या आहेत. मी त्याला भारत अ कडून खेळताना पाहिले नाही. परंतु त्याबद्दल जेवढे ऐकले आहे, त्याने केलेल्या धावा तसेच कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करायची ताकद यावरुन त्याला नक्कीच संघात स्थान दिले पाहिजे. गेले दोन हंगाम हा खेळाडू चांगली कामगिरी करत आहे आणि खोऱ्याने धावा करत आहे याचा अर्थ त्याला कसोटी संघात स्थान द्यायलाच हवे” असे आगरकर म्हणाला.

आगरकर भारताकडून २६ कसोटी, १९१ वनडे आणि ४ टी२० सामने खेळला आहे. सद्या हा माजी अष्टपैलू खेळाडू मुंबईच्या निवड समितीचा प्रमुख आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

मोठी बातमी- तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा

तब्बल ३८ वर्षांनंतर अँडरसनने केला आयसीसी क्रमवारीत हा मोठा पराक्रम

कर्णधार विराट कोहलीची आयसीसी क्रमवारीत घसरण