दिग्गज भारतीय गोलंदाज झुलन गोस्वामीची टी२० क्रिकेटमधून निवृत्ती

भारताची दिग्गज वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने आंतरराष्ट्रीय टी20 मधून निवृत्ती घेतली आहे. याबद्दल बीसीसीआयने माहीती दिली आहे.

गोस्वामीने भारताकडून 68 टी20 सामने खेळले असून यात तीने 56 विकेट्स घेतल्या आहेत. ती भारताकडून टी20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज आहे.

तिच्या पाठोपाठ पुनम यादव(53) आणि एकता बिश्त(50) आहेत. या तीनच गोलंदाजांनी भारताकडून टी20मध्ये 50 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत.

2006 ला झालेल्या भारतीय महिलांच्या पहिल्या टी20 सामन्यातून गोस्वामीने टी20 पदार्पण केले होते. यात तीने इंग्लंड विरुद्ध 14 धावा देत 2 विकेट घेतल्या होत्या.

टी20 मध्ये तीने 2012 मध्ये आॅस्ट्रेलिया विरुद्ध 11 धावा देत 5 विकेट घेतल्या होत्या. ही तिची टी20 कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे.

तिने तीचा शेवटचा टी20 सामना 10 जून 2018 ला बांगलादेश विरुद्ध खेळला आहे.

तसेच ती क्रिकेटच्या तीन्ही प्रकारात एका सामन्यात 5 विकेट्स घेणारी भारतीची पहिली गोलंदाज आहे. त्याचबरोबर ती वनडेमध्येही 200 विकेट्स घेणारी पहिली आणि एकमेव गोलंदाज आहे.

गोस्वामीने टी20 मधून निवृत्ती घेतल्याने यावर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या महिला टी20 विश्वचषकात भारताला तिच्याशिवाय खेळावे लागणार आहे.

भारत या विश्वचषकात साखळी फेरीत आॅस्ट्रेलिया, न्यूझिलंड, पाकिस्तान आणि आयर्लंड यांच्याबरोबर एका गटात आहे.

2001 नंतर पहिल्यांदाच गोस्वामी विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेंत खेळणार नाही. ती 2009 आणि 2010 ला झालेल्या महिला टी20 विश्वचषकात भारताची कर्णधार होती.

तिने बीसीसीआय आणि संघसहकाऱ्यांकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत. तसेच तिने भारताच्या टी20 संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

याबरोबरच टी20 मधून जरी तिने निवृत्ती स्विकारली असली तरी बीसीसीआयने ती वनडेमध्ये पुढे खेळणार असल्याचेही सांगितले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

विराट कोहलीचा कसोटी क्रमवारीत पुन्हा एकदा डंका

इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिका: पृथ्वी शॉ, हनुमा विहारीचा प्रथमच टीम इंडियामध्ये समावेश