आयसीसी वनडे क्रमवारीत भारतीय संघाची घसरण

बेंगलोर । भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध २१ धावांनी पराभूत झाल्यामुळे याचा मोठा फटका भारतीय संघाला बसला आहे. भारतीय संघाची आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.

तिसऱ्या वनडेत विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ आयसीसीस क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान झाला होता. भारताचे गुण तेव्हा १२० होते तर आफ्रिकेचे ११९ होते. परंतु काल झालेल्या पराभवामुळे भारतीय संघाचे गुण आन आफ्रिकेचे गुण ११९ झाले. परंतु काही पॉईंट्सच्या फरकाने दक्षिण आफ्रिका संघ पुन्हा अव्वल स्थानावर विराजमान झाला.

भारतीय संघ कसोटी आणि वनडे क्रमवारीत एकाच वेळी अव्वल स्थानी येण्याची ही पहिलीच वेळ होती. आयसीसी क्रमावरीला २००२ सालापासून सुरुवात झाली आहे.