पहिली कसोटी: भारतीय संघ संकटात, चौथा मोठा झटका

केपटाऊन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताला रोहित शर्माच्या रूपाने चौथा धक्का बसला आहे. त्याला कागिसो रबाडाने पायचीत केले.

रोहित आणि चेतेश्वर पुजारा या काल नाबाद असणाऱ्या जोडीने आज सुरुवात चांगली केली होती हे दोघेही संयमाने फलंदाजी करत होते. पण यांची भागीदारी जास्तवेळ रंगू न देता पहिल्या डावाच्या २९ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर रबाडाने रोहितला पायचीत केले.

रोहितने ५९ चेंडूत ११ धावा केल्या. याआधीही भारताने काल पहिल्या तीन फलंदाजांचे बळी लवकर गमावले होते. काल मुरली विजय(१), शिखर धवन(१६) आणि विराट कोहली(५) हे लवकर बाद झाले होते.

सध्या भारत पहिल्या डावात ४ बाद ६२ धावांवर असून आर अश्विन(४*) आणि पुजारा(२०*) नाबाद खेळत आहेत.