संपुर्ण वेळापत्रक- टीम इंडियाच्या न्यूझीलंड दौऱ्याचे वेळापत्रक घोषीत

भारतीय महिला आणि पुरुषांचा संघ जानेवारी महिन्यात न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय पुरुष संघ ५ वनडे आणि ३ टी२० सामने खेळणार आहे तर महिलांचा संघ ३ टी२० आणि ३ वनडे सामने खेळणार आहे.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने आज हे वेळापत्रक जाहीर केले आहे . यातील सर्व टी२० सामने अनुक्रमे वेलिंगटन, आॅकलंड आणि हॅमिल्टन येथे होणार आहेत. हे सर्व सामने double headers अर्थात महिला आणि पुरुषांचे एकाच दिवशी होणार आहे. महिलांचे टी२० सामने सायंकाळी ४ वाजता तर पुरुषांचे सामने रात्री ८ वाजता होणार आहेत.

महिलांचे वनडे सामने नेपियर, माऊंट मॉनगनुई आणि हॅमिल्टन येथे होणार आहे आणि याच मैदानावर महिलांचे वनडे सामन्यांपुर्वी १ किंवा २ दिवस आधी पुरुषांच्या वनडे मालिकेतील पहिले तीन सामने होणार आहे.

भारतीय पुरुष संघाचा न्यूझीलंड दौरा
वनडे सामन्यांचे वेळापत्रक –
२३ जानेवारी २०१९ ( नेपियर )
२६ जानेवारी २०१९ ( माऊंट मॉनगनुई )
२८ जानेवारी २०१९ ( माऊंट मॉनगनुई )
३१ जानेवारी २०१९ ( हॅमिल्टन )
३ फेब्रुवारी २०१९ ( वेलिंग्टन )

टी २० सामन्यांचे वेळापत्रक
६ फेब्रुवारी २०१९ ( वेलिंग्टन )
८ फेब्रुवारी २०१९ ( ऑकलंड )
१० फेब्रुवारी २०१९ ( हॅमिल्टन )

भारतीय महिला संघाचा न्यूझीलंड दौरा
वनडे सामन्यांचे वेळापत्रक –
२४ जानेवारी २०१९ ( नेपियर )
२९ जानेवारी २०१९ ( माऊंट मॉनगनुई )
१ फेब्रुवारी २०१९ ( माऊंट मॉनगनुई )

टी २० सामन्यांचे वेळापत्रक
६ फेब्रुवारी २०१९ ( वेलिंग्टन )
८ फेब्रुवारी २०१९ ( ऑकलंड )
१० फेब्रुवारी २०१९ ( हॅमिल्टन )

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

आम्ही या मैदानावर किंग आहोत, टीम इंडियाने पराभूत कण्याचा विचारही करु नये

अॅलिस्टर कुक म्हणतो, यामुळेच भारतीय संघ अव्वल स्थानी

मांजरेकर आज विराटला सल्ला देतायं, उद्या फेडररला देतील