काल झाला भारतीय क्रिकेटच्या इतिहासात विलक्षण योगायोग

काल भारताच्या पुरुष संघाने दक्षिण आफ्रिकेत दक्षिण आफ्रिकेवर तर महिला संघानेही दक्षिण आफ्रिकेतच दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. भारतीय पुरुष संघाने १२४ धावांनी तर महिला संघाने १७८ धावांनी हे विजय मिळवले.

या दोन्ही सामन्यात अनेक योगायोग पाहायला मिळाले-

-भारताच्या पुरुष आणि महिला संघाने एकाच दिवशी विजय मिळवायची ७वी वेळ. परंतु आजपर्यंत कधीही दोन्ही संघांनी एकाच दिवशी एकाच प्रतिस्पर्ध्याला पराभूत केले नव्हते.

-या दोन्ही सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतले. महिला संघाने प्रथम फलंदाजी करताना ३०२ तर पुरुष संघाने प्रथम फलंदाजी करताना ३०३ धावा केल्या.

-कालच्या सामन्यात स्म्रिती मानधनाने शतकी, कर्णधार विराट कोहलीने दीडशतकी खेळी केली तर झूलन गोस्वामीने कारकिर्दीतील २०० विकेट्सचा टप्पा तर माजी कर्णधार धोनीने यष्टींमागे ४०० बळींचा टप्पा पार केला.

-दक्षिण आफ्रिकेच्या महिलांचा संघ १२४ धावांवर सर्वबाद झाला तर पुरुषांच्या संघाला १२४ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

-काल भारतीय पुरुष संघाकडून कोहलीने शतक केले तर महिला संघाकडून स्म्रिती मानधनाने शतक केले. दोघांच्या जर्सीचा क्रमांक १८ आहे.