हास्यास्पद, मूर्खपणाचे आणि असामान्य: २ धावा जिंकायला राहिल्या असताना पंचांनी घेतला लंच ब्रेकचा निर्णय

आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडेत क्रिकेटमधील एक अजब निर्णय पाहायला मिळाला. भारतीय संघाला १९ षटकानंतर जिंकायला केवळ २ धावा हव्या असताना मैदानावरील पंचांनी लंच ब्रेकचा निर्णय घेतला.

दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण डाव ३२.२ षटकांत संपल्यामुळे पंचांनी भारताला डावानंतर घेतलेला ब्रेक घेऊ न देता सरळ फलंदाजीला बोलावले. जेव्हा पंचांनी लंच ब्रेक घोषित केला त्यापूर्वी भारताला २० मिनिटांत २० धावा बनवायच्या होत्या परंतु भारत १८ धावाच बनवू शकला. त्यामुळे पंचांनी नियमावर बोट ठेवत लंच ब्रेकचा निर्णय घेतला.

यावेळी कर्णधार कोहलीसह सर्वच मैदानातील उपस्थित चांगलेच वैतागलेले दिसले. अनेक प्रेक्षक सरळ मैदान सोडून घरी जाताना दिसले. यावेळी कोहलीने अलीम दार यांना सामना सुरु करण्यासाठी विनंती केली परंतु ती त्यांनी फेटाळून लावली. यामुळे खेळ मात्र ४५ मिनिटांनी लांबला.

परंतु यावेळी पंचांनी खेळ १५ मिनिटांनी पूर्वीच लांबवला होता असेही सांगितले जात आहे.

यावेळी समालोचकांनीही या निर्णयावर जोरदार टीका केली. स्टुपिड, अनकॉमन, रेडिक्युलस असे शब्द यावेळी समालोचक या निर्णयाबद्दल वापरताना दिसले.

यावेळी हर्षा भोगले यांनी हे हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे.

याबद्दल सोशल माध्यमांवरही अनेकांनी या निर्णयावर टीका केली.