३५ षटकांत भारताला जिंकण्यासाठी ५ विकेट्सची गरज

कोलकाता । येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या कसोटी सामन्यात भारताला जिंकण्यासाठी ३५ षटकांत ५ विकेट्सची गरज आहे. सध्या खेळपट्टीवर निरोशन डिकवेलला आणि दिनेश चंडिमल हे खेळाडू खेळत आहेत.

भारताने आपला दुसरा डाव ८ बाद ३५२ धावांवर घोषित केला. त्यात कर्णधार कोहलीच्या शतकी खेळीचा समावेश आहे. दुसरा डाव घोषित केला तेव्हा संघाकडे २३० धावांची आघाडी होती.

दिवसातील ३५ षटके बाकी आहेत. जर आज संपूर्ण षटके खेळली गेली तर हा सामना जिंकण्याची भारताला मोठी संधी आहे.