महिला विश्वचषक: दक्षिण आफ्रिकेचे भारतापुढे २७४ धावांचे तगडे आव्हान

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या महिला विश्वचषकातील भारताच्या पाचव्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर ७४ धावांचे तगडे आव्हान उभे केले आहे.

दक्षिण आफ्रिकडून लिझेल लीने ९२ धावांची शानदार खेळी केली, तर डी. वन निरकर्क ने ५७ धावांची खेळी केली. भारताकडून शिखा पांडेने ३, एकता बिश्तने २ तर झुलन गोस्वामी आणि पूनम राऊत यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

२७४ धावांचा लक्ष मैदानात घेऊन उतरलेल्या भारताची सुरुवात खराब झाली असून सलामीवीर स्म्रिती मंधाना ४ धावा काढून बाद झाली आहे.