कर्णधार म्हणून विराट कोहलीकडून ही अभिमानास्पद कामगिरी

इंदोर । कर्णधार विराट कोहली सध्या फलंदाज आणि कर्णधार म्हणून ना भूतो ना भविष्यती अशी कामगीरी करत आहे. हा खेळाडू प्रत्येक सामन्यागणिक काही ना काही खास विक्रम करत आहे.

परंतु एक असा विक्रम काल विराटच्या नावावर झाला आहे जो कोणत्याही कर्णधाराला हवाहवासा वाटेल. भारतीय संघ आजच्या विजयानंतर दक्षिण आफ्रिकेला मागे टाकून वनडे क्रमवारीत पहिल्या स्थानावर गेला आहे. तर भारत आधीपासूनच कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे.

एकाच वेळी कसोटी आणि वनडेत पहिल्या क्रमांकावर असण्याचा खास विक्रम विराटच्या नावावर झाला आहे. भारतीय क्रिकेट संघ १२५ गुणांसह कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे तर इंदोर वनडेत विजयासह भारताने एकदिवसीय जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

सध्या वनडेत भारतीय संघाचे १२० गुण असून दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचे ११९ तर ११४ गुणांसह ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे.

आयसीसी वनडे क्रमवारी

१२० भारत
११९ दक्षिण आफ्रिका
११४ ऑस्ट्रेलिया
११३ इंग्लंड
१११ न्यूजीलँड
९५ पाकिस्तान
९४ बांगलादेश
८६ श्रीलंका
७८ विंडीज
५४ अफगाणिस्तान
५२ झिम्बाब्वे
४१ आयर्लंड