सचिनप्रेमींना भारत पाकिस्तान सामन्यात एक खास सरप्राईज

भारत विरुद्ध पाकिस्तान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सामना येत्या रविवारी अर्थात उद्या खेळवला जाणार आहे. क्रिकेटचाहत्यांचं लक्ष लागून राहिलेल्या या सामन्यात क्रिकेटप्रेमींना एक खास सरप्राईज मिळू शकत. सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कॉमेन्ट्री करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सचिन या सामन्यात आकाश चोप्रा, सुनील गावसकर, सबा करीम आणि वीरेंद्र सेहवागबरोबर हिंदीतून कॉमेन्ट्री करतांना दिसू शकतो.

विशेष म्हणजे भारताचा हा महान फलंदाज यापूर्वी कधीही कॉमेन्ट्री करताना दिसलेला नाही. जर सचिनने या सामन्यात कॉमेन्ट्री केली तर त्याच हे कॉमेन्ट्री बॉक्समधलं आगमन असेल तर त्याच्या चाहत्यांसाठी हे सरप्राईज.

काही दिवसांपूर्वीच स्टार स्पोर्टने त्यांच्या समालोकांची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी नावे घोषित केली होती. परंतु त्यात मास्टर ब्लास्टर सचिनचं नाव नव्हतं.
यापूर्वी क्रिकेट एक्स्पर्ट म्हणून सचिन आजतक या न्युज चॅनेलवर २०१५ च्या क्रिकेट विश्वचषकाच्या वेळी दिसला होता.