विश्वचषक जिंकला इंग्लंडने, सोशल मीडियावर चर्चा झाली टीम इंडियाची

इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मेपासून सुरु झालेल्या 2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकाची रविवारी(14 जूलै) सांगता झाली. यजमान इंग्लंडने या विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले आणि त्यांचे 44 वर्षांचे विश्वचषक विजयाचे स्वप्न पूर्ण केले. हे इंग्लंडचे पहिलेच विश्वविजेतेपद आहे.

या विश्वचषकातील शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचकारी झालेल्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरही बरोबरी सुटल्यानंतर बाऊंड्रीच्या फरकांच्या आधारावर इंग्लंडने न्यूझीलंडवर मात करुन हे विश्वविजेतेपद मिळवले.

या संपूर्ण स्पर्धेबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. 20 मे ते 15 जूलै या दरम्यान या विश्वचषकासाठी असणाऱ्या #CWC19 या हॅशटॅगचा वापर करुन 3.1 कोटी ट्विट करण्यात आले आहेत. त्यामुळे 2015 च्या विश्वचषकाच्या #CWC15 या हॅशटॅगच्या तुलनेत #CWC19चा वापर 100 टक्क्याने जास्त करण्यात आला आहे.

याबरोबर आयसीसीने @ICC आणि @cricketworldcup या ट्विटर हँडेलवरुन विश्वचषकाचे विविध व्हिडिओही शेअर केले होते. हे व्हिडिओ दोन्ही ट्विटर हँडेल्स वरुन एकून 6 कोटी वेळा पाहण्यात आले आहेत.

त्याचबरोबर या विश्वचषकादरम्यान भारताची सर्वाधिक चर्चा झाली आहे.विश्वचषकादरम्यान सर्वाधिक ट्विट 16 जूनला झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दल करण्यात आले आहेत. या सामन्याचे 29 लाख ट्विट करण्यात आले आहेत. तसेच ट्विटरवरील हा सर्वाधिक चर्चेत असलेला सामनाही ठरला आहे.

या सामन्यापाठोपाठ इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात झालेला अंतिम सामन्याबद्दल ट्विटरवर चर्चा झाली आहे. तसेच या यादीत तिसऱ्या क्रमांकावर भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील उपांत्य सामन्याची चर्चा झाली.

त्याचबरोबर भारताचा कर्णधार विराट कोहलीचा 87 वर्षीय भारतीय संघाच्या चाहत्या चारुलता पटेल यांच्याबरोबरील फोटो सर्वाधिक रिट्विट करण्यात आला. त्याचबरोबर ट्विटरवर भारतीय संघाचा हॅशटॅग #TeamIndia तसेच विराट कोहलीसाठी असलेला हॅशटॅग #ViratKohli हे सर्वाधिक वापरला गेला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

मास्टर ब्लास्टर तेंडुलकरने विजेता ठरवण्यासाठी बाउंड्री नियमाऐवजी सुचवला हा पर्याय

विश्वचषक २०१९ दरम्यान झाले हे खास चार विश्वविक्रम

रवी शास्त्रींची उचलबांगडी पक्की? बीसीसीआयने नवीन प्रशिक्षकांसाठी मागवले अर्ज