टीम इंडीयाने गाठली आहे या पाच देशांविरुद्ध वनडे सामन्यांची शंभरी

भारत-विंडीज यांच्यात 21 ऑक्टोबरपासून पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होत आहे. भारताने आत्तापर्यंत 948 आतंरराष्ट्रीय वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी पाच देशांविरुद्ध 100 पेक्षा अधिक सामने खेळले असून असे करणारा भारत हा पहिलाच देश आहे.

भारताने ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका आणि विंडीज या देशांविरुद्ध 100 पेक्षा अधिक वनडे सामने खेळले आहेत. तर ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान या संघांनी चार संघाविरुद्ध अशी कामगिरी केली आहे.

त्याचप्रमाणे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय वनडे सामने खेळण्यामध्ये भारत हा पहिल्या क्रमांकाचा संघ आहे. तसेच विंडीज विरूद्धच्या आगामी वनडे मालिकेत त्यांना 950 वनडे सामन्यांचा आकडा पार करण्याची संधी आहे. याआधी ऑस्ट्रेलियानेच 900 वनडे सामन्यांचा आकडा पार केला आहे. त्यांनी 916 वनडे सामने खेळले आहेत. तर पाकिस्तानने 899 वनडे सामने खेळले आहेत.

आतंरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) 12 संघ पूर्ण तर 93 सहसदस्य आहेत. यामधील ऑस्ट्रेलियाने इंग्लंड, भारत, न्यूझीलंड आणि विंडीज, तर पाकिस्तानने भारत, न्यूझीलंड, श्रीलंका आणि विंडीज विरुद्ध 100 पेक्षा अधिक वनडे सामने खेळले आहेत.

भारत एकूण 19 संघाविरुद्ध वनडे सामने खेळला असून नेदरलॅंड, स्कॉटलंड आणि झिम्बाब्वे यांनीही अशी कामगिरी केली आहे.

ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बांग्लादेश, इंग्लंड, आर्यलंड, पाकिस्तान आणि विंडीज यांनी 18 संघाविरुद्ध वनडे सामने खेळले आहे.

तसेच भारताने सहा देशांविरुद्ध 50 पेक्षा सर्वाधिक वनडे सामन्यांत विजय मिळवला आहे. यामध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, पाकिस्तान, झिम्बाब्वे आणि विंडीज यांचा समावेश आहे. तसेच ऑस्ट्रेलियानेही इंग्लंड, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड आणि विंडीज संघाविरुद्ध अशी कामगिरी केली आहे.

या संघाविरुद्ध भारताने खेळले आहेत 100 पेक्षा अधिक वनडे सामने

128 सामने – ऑस्ट्रेलिया (45 विजय, 73 पराभव)

101 सामने – न्यूझीलंड  (51 विजय, 44 पराभव)

131 सामने – पाकिस्तान  (54 विजय, 73 पराभव)

158 सामने – श्रीलंका (90 विजय, 56 पराभव)

121 सामने – विंडीज (56 विजय, 61पराभव)

महत्त्वाच्या बातम्या:

वनडेमध्ये असा पराक्रम करणारा भारत ठरेल पहिलाच संघ

कपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम?

एकदा- दोनदा नाही तर चक्क ६व्यांदा करणार विराट हा पराक्रम