पदार्पणाच्या सामन्यातच १८ वर्षीय पृथ्वी शाॅला सामनावीर पुरस्कार

राजकोट। सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पार पडलेल्या भारत विरुद्ध विंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्याच दिवशी भारताने एक डाव आणि 272 धावांनी विजय मिळवला आहे.

या सामन्यात भारताने विंडिजचा पहिला डाव 181 धावांवर संपुष्टात आणला होता. त्यामुळे भारताने पहिल्या डावात 468 धावांची भक्कम आघाडी घेतल्याने विंडिजला फॉलोआॅन दिला.

परंतू पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही विंडिजची फलंदाजी 196 धावात कोलमडली.

या सामन्यात पृथ्वी शाॅला सामनावीर पुरस्कार म्हणुन घोषीत करण्यात आले. त्याने पहिल्या डावात १५४ चेंडूत १३४ धावा केल्या होत्या.

त्याने पदार्पणाच्या सामन्यातच शतकी ही शतकी खेळी केली होती. यामुळे पदार्पणाच्या सामन्यातच सामनावीर पुरस्कार मिळवणारा तो ६वा खेळाडू ठरला होता.

यापुर्वी पारस म्हांब्रे, आरपी सिंग, आर अश्विन, शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनीच पदार्पणाच्या कसोटी सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळवला आहे.

महत्वाच्या बातम्या-

कुलदीप यादवचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कहर कारनामा

-टाॅप ५- उद्यापासून सुरु हेत असलेल्या प्रो-कबड्डीमधील मजेशीर आकडेवारी

-पहिल्या कसोटी सामन्यासाठी आॅस्ट्रेलिया संघाची घोषणा, तब्बल ३ खेळाडू करणार पदार्पण