टी२० विजयाबरोबर भारतीय संघ पाकिस्तान, आफ्रिका व श्रीलंका संघाच्या पंक्तीत

रांची । काल भारतीय संघाने पहिल्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलिया संघावर ९ विकेट्सने विजय मिळवला. भारताचा हा आंतरराष्ट्रीय टी२०मधील ५०वा विजय होता.

यापूर्वी केवळ पाकिस्तान (विजय- ६९, पराभूत-४५), दक्षिण आफ्रिका (विजय- ५७, पराभूत-४०) आणि श्रीलंका (विजय- ५१, पराभूत-४३) हे देश ५० किंवा त्यापेक्षा जास्त टी२० सामने जिंकले आहेत.

विशेष म्हणजे भारतीय संघ आजपर्यंत ८४ पैकी ५१ सामने जिंकला असून ३१ सामने पराभूत झाला आहे. एक सामना टाय तर २ सामन्यात कोणताही निकाल लागला नाही.

आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळलेल्या सर्व संघांमध्ये एक अफगाणिस्तान सोडून भारताची विजयाची टक्केवारी ही सर्वोत्तम आहे.