पराभवानंतरही टीम इंडिया अव्वल स्थानी कायम

इंग्लंड विरुद्ध भारत संघात मंगळवारी पार पडलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यांनंतर बुधवारी आयसीसीने कसोटी क्रमवारी जाहिर केली आहे.

इंग्लंडने भारताविरुद्ध या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 4-1 अशा फरकाने विजय मिळवला आहे. या विजयामुळे इंग्लंडने आयसीसीच्या संघ क्रमवारीत प्रगती केली आहे. या क्रमवारीत इंग्लंडने न्यूझीलंडला मागे टाकत चौथे स्थान मिळवले आहे.

तसेच भारतीय संघ या पराभवानंतरही अव्वल स्थानी कायम राहिला आहे. मात्र असे असले तरी भारताला त्यांचे गुण गमवावे लागले आहेत. भारत ही मालिका सुरु होण्याआधी 125 गुणांसह अव्वल स्थानी होता. पण आता इंग्लंड विरुद्ध झालेल्या पराभवामुळे भारताला 10 गुण गमवावे लागले आहेत.

त्याचबरोबर इंग्लंडने ही मालिका 97 गुणांसह पाचव्या स्थानी असताना सुरु केली होती. पण त्यांनी भारताविरुद्ध मिळवलेल्या दमदार विजयानंतर 8 गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे इंग्लंड संघ आता 105 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आला आहे.

जो रुट कर्णधार असलेला इंग्लंडचा संघ या क्रमवारीत दक्षिण आफ्रिका आणि आॅस्ट्रलिया यांच्या पेक्षा फक्त एका गुणाने मागे आहे. हे दोन्ही संघ 106 गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पण दक्षिण आफ्रिका काही दशांश गुणांनी आॅस्ट्रेलियाच्या पुढे आहे.

त्याचबरोबर पाचव्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडच्या संघाचे गुण 102 आहेत. त्यामुळे आयसीसी संघ क्रमवारीत आता चांगलीच चुरस आणि स्पर्धा पहायला मिळत आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

काय आहे मॅकग्राचे अँडरसनला नवीन आव्हान?

कूक-पीटरसनमध्ये मैत्रीचे नवे पर्व?

जेम्स अँडरसन बनला कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज