पाचवी वनडे: शेवटच्या वनडे सामन्यात हे असतील भारताचे ११ खेळाडू !

कोलंबो । आज भारत विरुद्ध श्रीलंका पाचवा आणि शेवटचा वनडे सामना येथे होत आहे. भारताने पहिले चारही सामने जिंकून मालिकेत ४-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. आज विजय मिळवून भारतीय संघ मालिकेत निर्भेळ यश मिळवण्यासाठी इच्छूक आहे.

शिखर धवन खाजगी कारणामुळे हा वनडे सामना आणि एकमेव टी२० सामना खेळणार नाही. त्यामुळे बॅकअप सलामीवीर असलेल्या मुंबईकर अजिंक्य रहाणेला आज भारतीय संघातून रोहित शर्माबरोबर संधी मिळू शकते.

कर्णधार विराट कोहली, मनीष पांडे आणि यष्टीरक्षक एमएस धोनी यांच्या फलंदाजी क्रमवारीत कोणतंही बदल होणार संघ करणार नाही. केएल राहुलला पुन्हा एक संधी मिळण्याची शक्यता आहे.

अष्टपैलू हार्दिक पंड्यावर संघ व्ययस्थापन पुन्हा विश्वास ठेवेल तर अक्सर पटेल, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर आणि जसप्रीत बुमराह यांचे स्थान या सामन्यात पक्के आहे.

संभाव्य भारतीय संघ:जिंक्य रहाणे, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मनीष पांडे, एमएस धोनी (यष्टीरक्षक फलंदाज), हार्दिक पंड्या, अक्सर पटेल. कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह