विश्वचषक २०१९: टीम इंडियाच्या पत्रकार परिषदेवर मीडियाचा बहिष्कार, जाणून घ्या कारण

2019 आयसीसी क्रिकेट विश्वचषकात भारताचा पहिला सामना बुधवारी(5 जून) दक्षिण आफ्रिका विरुद्ध साउथँम्पटनला होणार आहे. या विश्वचषकाआधी भारतीय संघ रोज बॉल मैदानावर जोरदार सराव करत आहे.

सोमवारी भारतीय संघाच्या सराव सत्रानंतर पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र या पत्रकार परिषदेला विश्वचषकासाठी निवड करण्यात आलेल्या भारतीय संघातील एकही खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफमधील सदस्य आले नव्हते.

त्यांच्याऐवजी भारतीय संघाला सराव देण्यासाठी इंग्लंडला आलेले दिपक चहर आणि आवेश खान हे नेट गोलंदाज पत्रकार परिषदेसाठी येत असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे पत्रकारांनी या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला आणि ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली.

भारताच्या पहिल्या सामन्यासाठी दोनच दिवस बाकी राहिले असल्याने संघातील कोणीतरी वरिष्ठ खेळाडू किंवा प्रशिक्षक या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहतील असे वाटले होते. पण भारतीय संघाचे व्यवस्थापकांनी चहर आणि आवेश हे दोघे लवकरच भारतात परतत असल्याने पत्रकार परिषदेत येतील असे सांगितले.

मात्र या दोघांचाही विश्वचषकासाठी भारतीय संघात समावेश नसल्याने त्यांना संघाच्या संबंधित उत्तरे देण्याचा कोणताही मोठा अधिकार नाही. त्यामुळे पत्रकारांनी भारतीय संघाच्या व्यवस्थापनावर नाराजी व्यक्त केली आहे.

ज्यावेळी भारतीय संघातील कोणी वरिष्ठ खेळाडू किंवा प्रशिक्षकांपैकी कोणी आले का नाही, याबद्दल विचारणा केल्यावर अजून भारताचे सामने सुरु व्हायचे आहेत, असे बीसीसीआयच्या अधिकारीद्वारा सांगण्यात आले.

या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकण्यामागे पत्रकारांचा चहर आणि आवेश यांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. तर विश्वचषकातील भारताचा पहिला सामना केवळ दोन दिवसांवर येवून ठेपला असतानाही भारतीय संघातील एकाही वरिष्ठ सदस्याने पत्रकारांशी संवाद साधला नसल्याने ही नाराजी व्यक्त केली आहे.

त्याचबरोबर भारतीय संघ या विश्वचषकासाठी आत्तापर्यंत इंग्लंडला आल्यापासून फक्त केएल राहुलने एकदाच मीडियाची संवाद साधला होता. त्याने बांगलादेश विरुद्धच्या सराव सामन्यात शतक केल्यांनतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली होती. त्या व्यतिरिक्त कोणत्याही सदस्याने मीडियाशी संवाद साधलेला नाही.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडीबातम्यासदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

विश्वचषक २०१९: भारताच्या या खेळाडूची झाली डोपिंग टेस्ट

टीम इंडियाचे २०१९-२० मधील घरच्या सामन्यांचे वेळापत्रक घोषित; पुणे-मुंबईमध्ये होणार हे सामने

पाकिस्तान विरुद्ध इंग्लंडच्या या खेळाडूने घेतले तब्बल ४ झेल, विश्वविक्रमाचीही केली बरोबरी