टीम इंडियाचा ६ वेळच्या विश्वविजेत्या अर्जेंटिनाला पराभवाचा धक्का, रचला मोठा इतिहास

स्पेनमधील COTIF या 20 वर्षाखालील स्पर्धेत भारतीय संघाने अर्जेंटिनाचा 2-1 असा पराभव करत इतिहास रचला.
भारतीय संघातील दहापैकी आठ फुटबॉलपटू हे 17 वर्षाखालील फिफा विश्वचषकात खेळले आहे. 54व्या मिनिटाला अनिकेत जाधवला रेड कार्ड मिळाल्याने 11 जणांचा संघ दहा झाला.
चौथ्याच मिनिटाला दिपक तनगीरने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. तर सामन्याच्या उत्तरार्धात 68व्या मिनिटाला अन्वर अलीने दुसरा गोल करत भारताला 2-0 अशी आघाडी दिली.
अर्जेंटिनाने 20 वर्षाखालील सहा विश्वचषक जिंकले आहे.
भारतीय संघाच्या या कामगिरीने नक्कीच त्याने जागतिक पातळीवर फुटबॉलमध्ये नाव झाले, असे भारतीय संघाचे प्रशिक्षक फ्लॉइड पिंटो म्हणाले.
या दोन्ही संघाचा एकमेकांविरुद्ध हा दुसराच सामना आहे. याआधी ते 1984 च्या तिसऱ्या नेहरू चषकात खेळले होते. यामध्ये भारत 0-1 ने पराभूत झाला होता.
भारताचा गोलकिपर प्रभाकरन गील याची या सामन्यात चांगलीच कसोटी होती. त्याने अर्जेंटिना संघाने केलेले अनेक प्रयत्न परतवून लावले.
तनगीरने केलेल्या पहिल्या गोलने भारतीय संघात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अलीच्या गोलने अजून त्यात भर पडली.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–मयांक अगरवाल, पृथ्वी शाॅच्या फटाकेबाजी समोर दक्षिण आफ्रिका अ उध्वस्त