भारतीय क्रिकेट संघाचा असाही एक विक्रम

२३ जून रोजी झालेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात पावसामुळे पहिल्या डावात ३९.२ षटके झाली असताना खेळ थांबवण्यात आला. भारतीय संघाने ३ खेळाडूंच्या बदल्यात १९९ धावा या सामन्यात केल्या होत्या.

पावसामुळे हा सामना पुढे खेळवला जाऊ शकला नाही. परंतु हा सामना न खेळवला गेल्यामुळे भारतीय संघाच्या नावावर एक वेगळाच विक्रम लावला गेला.

कोणताही निकाल न लागलेले सर्वात जास्त सामने खेळायचं रेकॉर्ड आता भारतीय संघाच्या नावावर आहे. तब्बल ९१३ एकदिवसीय सामने खेळलेल्या भारतीय संघाच्या आजपर्यंतच्या एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात तब्बल ४० सामन्यांत कोणताही निकाल लागू शकलेला नाही.

यापूर्वी हा विक्रम भारत आणि न्युझीलँड संघाच्या संयुक्त नावावर होता. न्युझीलँड संघ आजपर्यंत ७२८ सामने खेळला असून त्यात ३९ सामन्यात कोणताही निकाल लागलेला नाही.

सर्वात जास्त एकदिवसीय क्रिकेट सामने ज्यात कोणताही निकाल लागला नाही असे खेळलेला संघ (कंसात एकूण सामने )
४० भारत (९१३)
३९ न्युझीलँड (७२८)
३६ श्रीलंका (७९३)
३४ ऑस्ट्रेलिया (९०१)
२६ वेस्ट इंडिज (७५८)

भारत वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी ६ वाजून ३०मिनिटांनी सुरु होईल.