भारतीय संघाची ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या तीन सामन्यांसाठी घोषणा

ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या ५ एकदिवसीय सामन्यांपैकी पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा आज झाली. श्रीलंका दौऱ्यातील संघ बऱ्यापैकी कायम ठेवून उमेश यादव आणि मोहम्मद शमी या खेळाडूंनी भारतीय संघात कमबॅक केले आहे.

शार्दूल ठाकूर या श्रीलंकेविरुद्ध वनडे पदार्पण करणाऱ्या खेळाडूला विश्रांती देण्यात आली आहे. शार्दुलच्या जागी उमेश यादवला संघात स्थान देण्यात आले आहे. तर आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या खेळाडूंना या मालिकेतही विश्रांती देण्यात आली आहे.

हा संघ रोटेशन पद्धतीने निवडला असल्याचं निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी सांगितलं आहे. या संघात एकूण १६ खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघ

विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), एमएस धोनी (यष्टीरक्षक फलंदाज), शिखर धवन, केएल राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, अजिंक्य रहाणे, हार्दिक पंड्या, अक्सर पटेल, कुलदीप यादव, युझवेन्द्र चहल, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहमंद शमी, भुवनेश्वर कुमार