उसळते चेंडू टाकून याच्या बरगड्या मोडा, स्टिव स्मिथने दिले होते कमिन्सला आदेश

कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या भारतीय फिरकी जोडीने गेल्या वर्षभरात जगभरातील भल्या भल्या फलंदाजांना घाम फोडला आहे.

कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल ही फिरकी जोडी नुकतेच ‘व्हाट द डक’ या कार्यक्रमात आली होती.

कुलदीप आणि चहलने या कार्यक्रमात त्यांचे क्रिकेट संबंधीत अनेक आठवणी आणि किस्से सांगितले.

यामध्ये कुलदीप यादवने त्याच्य कसोटीतील पदार्पणाच्या सामन्याबाबतचा एक किस्सा सांगितला.

२०१७ साली धरमशाळा येथिल कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव स्मिथने १० व्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या कुलदीप यादवला जखमी करण्याचे आदेश वेगवान गोलंदाज पॅट कमिंन्सला दिले होते.

“स्टिव स्मिथ पॅट कमिंन्सला माझ्या शरीरावर गोलंदाजी करुन मला जखमी कर असे सांगत होता. मला ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करता येणार नाही अश्या पद्धतीने मला जखमी करण्याचा स्मिथने कमिंन्सला आदेश दिला होता.” या प्रकरणाबाबतचा खुलासा करताना कुलदीपने सांगितले.

आपल्या पदार्पणाच्या सामन्यात कुलदीपने ऑस्ट्रेलियाचे पहिल्या डावात ४ गडी बाद करुन ऑस्ट्रेलियन फलंदाजांची भंबेरी उडवली होती.

मार्चमध्ये दक्षिण अफ्रिकेत आणि आता इंग्लंडमध्ये धुमाकूळ घालत असलेली कुलदीप-चहल जोडी भारताच्या एकदिवसीय आणि टि-20 संघाच्या गोलंदाजीचा कणा बनली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-कोलकाता नाईट रायडर्सने केली मोठी घोषणा, हा खेळाडू आपल्या ताफ्यात

-फिफा विश्वचषक २०१८: पराभवानंतर वार्नर-गंभीरने इंग्लंडला केले ट्रोल