संपूर्ण वेळापत्रक: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे मालिकेचे वेळापत्रक

किंग्समेड । कसोटी मालिकेतील १-२ अशा पराभवानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ वनडे मालिकेत एकूण ६ सामने होणार आहे.

१ फेब्रुवारी रोजी पहिला वनडे सामना होणार असून १६ फेब्रुवारी रोजी सहावा आणि शेवटचा वनडे सामना सेंच्युरियनवर होणार आहे. त्यानंतर ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे.

भारतीय संघाची टी२० मालिका ही डबल हेडर असून भारतीय पुरुष संघाच्या तीन टी२० सामन्यांबरोबर महिलांच्या टी२० मालिकेतील ५ पैकी शेवटचे तीन सामने होतील. महिला संघ या दौऱ्यात तीन वनडे आणि ५ टी२० सामने खेळणार आहे. हा दौरा २ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी असा असेल.

भारतीय पुरुष संघाचा दुसरा वनडे सामना आणि पहिला टी२० सामना हा फक्त दिवस रात्र होणार नसून बाकी संपूर्ण वनडे आणि टी२० मालिका दिवस-रात्र सामन्यांची असेल.

वनडे मालिका (पुरुष संघ)-
१ फेब्रुवारी – पहिला वन-डे सामना, किंग्समेड (दिवस-रात्र) (दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी)
४ फेब्रुवारी – दुसरा वन-डे सामना, सेंच्युरियन (दिवस) (दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी)
७ फेब्रुवारी – तिसरा वन-डे सामना, केप टाऊन (दिवस-रात्र) (दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी)
१० फेब्रुवारी – चौथा वन-डे सामना, जोहान्सबर्ग (दिवस-रात्र) (दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी)
१३ फेब्रुवारी – पाचवा वन-डे सामना, पोर्ट एलिजाबेथ (दिवस-रात्र) (दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी)
१६ फेब्रुवारी – सहावा वन-डे सामना, सेंच्युरियन (दिवस-रात्र) (दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी)

वनडे मालिका (महिला संघ)-
५ फेब्रुवारी – पहिला वन-डे सामना, किंबेरली
७ फेब्रुवारी – दुसरा वन-डे सामना, किंबेरली
१०फेब्रुवारी – तिसरा वन-डे सामना, पॉटचेस्टरूम