टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला रवाना, कर्णधार कोहलीसोबत पत्नी अनुष्काही

मुंबई । गेली अनेक महिने घराच्या मैदानावर प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत भारतीय संघ आज दक्षिण आफ्रिकेत विजयाचे निशाण रोवण्यासाठी रवाना झाला. मुंबई विमानतळावरून संघ सकाळीच या ५६ दिवसांच्या या दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेकडे मार्गस्थ झाला.

यावेळी नवविवाहित कर्णधार कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा विमानतळावर संघाच्या बसने न येता खाजगी वाहनाने आले होते. भारतीय संघातील बहुतेक खेळाडूंची आता लग्न झाली असून वॅग्ज संस्कृतीप्रमाणे बरेच खेळाडू आपल्या पत्नी किंवा गर्लफ्रेंडबरोबर परदेश दौऱ्यावर जातात. 

त्यात आता विराट कोहलीचाही समावेश झाला आहे. जेव्हा संघ ५ जानेवारी रोजी पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात येईल तेव्हा तो संघाचा २०१८मधील पहिलाच सामना असेल. या सामन्यापूर्वी संघ २ दिवसांचे सराव शिबिरात भाग घेणार आहे.

View this post on Instagram

Packing time…. time for South Africa ✈️

A post shared by Ishant.sharma (@ishant.sharma29) on

भारतीय संघ: विराट कोहली(कर्णधार), मुरली विजय,के एल राहुल, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, रिद्धिमान सहा(यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव, जसप्रीत बुमराह.

View this post on Instagram

Aaanddd we’re off 🛫🇿🇦 @mvj8

A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45) on

भारतीय पुरुष संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा-
कसोटी मालिका-
३० ते ३१डिसेंबर – सराव सामना
५ ते ९ जानेवारी – पहिली कसोटी, केप टाऊन
१३ ते १७ जानेवारी – दुसरी कसोटी, सेंच्युरियन
२४ ते २८ जानेवारी – तिसरी कसोटी, जोहान्सबर्ग