असा असेल भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने आज भारतीय संघाच्या ६० दिवसांच्या दौऱ्याची घोषणा केली. ३० डिसेंबर रोजी सराव सामन्याने सुरु होणारा हा दौरा २४ फेब्रुवारी रोजी तिसऱ्या टी२० सामन्याने केप टाउन येथे संपेल. भारतीय संघ या दौऱ्यात एक सराव सामना, ३ कसोटी सामने, ६वनडे सामने आणि ३ टी२० सामने खेळणार आहे.

भारतीय संघाची टी२० मालिका ही डबल हेडर असून भारतीय पुरुष संघाच्या तीन टी२० सामन्यांबरोबर महिलांच्या टी२० मालिकेतील ५ पैकी शेवटचे तीन सामने होतील. महिला संघ या दौऱ्यात तीन वनडे आणि ५ टी२० सामने खेळणार आहे. हा दौरा २ फेब्रुवारी ते २४ फेब्रुवारी असा असेल.

भारतीय पुरुष संघाचा दुसरा वनडे सामना आणि पहिला टी२० सामना हा फक्त दिवस रात्र होणार नसून बाकी संपूर्ण वनडे आणि टी२० मालिका दिवस-रात्र सामन्यांची असेल.

भारतीय पुरुष संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा-
कसोटी मालिका-
३० ते ३१डिसेंबर – सराव सामना
५ ते ९ जानेवारी – पहिली कसोटी, केप टाऊन
१३ ते १७ जानेवारी – दुसरी कसोटी, सेंच्युरियन
२४ ते २८ जानेवारी – तिसरी कसोटी, जोहान्सबर्ग

वनडे मालिका-
१ फेब्रुवारी – पहिला वन-डे सामना, किंग्समेड (दिवस-रात्र)
४ फेब्रुवारी – दुसरा वन-डे सामना, सेंच्युरियन (दिवस)
७ फेब्रुवारी – तिसरा वन-डे सामना, केप टाऊन (दिवस-रात्र)
१० फेब्रुवारी – चौथा वन-डे सामना, जोहान्सबर्ग (दिवस-रात्र)
१३ फेब्रुवारी – पाचवा वन-डे सामना, पोर्ट एलिजाबेथ (दिवस-रात्र)
१६ फेब्रुवारी – सहावा वन-डे सामना, सेंच्युरियन (दिवस-रात्र)

टी२० मालिका-
१८ फेब्रुवारी – पहिला टी-२० सामना, जोहान्सबर्ग (दिवस)
२१ फेब्रुवारी – दुसरा टी-२० सामना, सेंच्युरियन (दिवस-रात्र)
२४ फेब्रुवारी – तिसरा टी-२० सामना, केप टाऊन (दिवस-रात्र)

भारतीय महिला संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा-
वनडे मालिका-
५ फेब्रुवारी – पहिला वन-डे सामना, किंबेरली
७ फेब्रुवारी – दुसरा वन-डे सामना, किंबेरली
१०फेब्रुवारी – तिसरा वन-डे सामना, पॉटचेस्टरूम

टी२० मालिका-
१३ फेब्रुवारी – पहिला टी-२० सामना, पॉटचेस्टरूम
१६ फेब्रुवारी – दुसरा टी-२० सामना, ईस्ट लंडन
१८ फेब्रुवारी – तिसरा टी-२० सामना, जोहान्सबर्ग
२१ फेब्रुवारी – चौथा टी-२० सामना, सेंच्युरियन
२४ फेब्रुवारी – पाचवा टी-२० सामना, केप टाऊन