१९ वर्षाखालील टीम इंडियाने उडवला श्रीलंकेचा धुव्वा

19 वर्षाखालील भारतीय संघ आणि श्रीलंका यांच्यात सोमवारपासून (30 जुलै) पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला.

कोलंबो येथील पी सीरा ओव्हल मैदानावर झालेल्या पहिल्या वन-़डे सामन्यात भारताने श्रीलंकेचा 6 गडी राखून पराभव केला.

श्रीलंकेचा कर्णधार निपुन धनंजयाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय श्रीलंकेसाठी चांगलाच महागात पडला.

श्रीलंकेला पहिल्याच षटकात भारताच्या मोहित जांग्राने निशान मधुश्काला बाद करत जोरदार धक्का दिला. त्यानंतर श्रीलंकेला आपला डाव सावरण्यात अपयश आले.

श्रीलंकेने 38.4 षटकात सर्वबाद 143 धावा केल्या. यामध्ये तळातील फलंदाज निपुन मलिंगा 38 आणि आणि कर्णधार निपुन धनंजया 34 यांचे सर्वाधिक योगदान होते.

भारताकडून गोलंदाजी करताना अजय देव गौडाने 18 धावात सर्वाधिक तीन बळी मिळवले तर मोहित जांग्रा, यतिन मंगवानी आणि आयुष बदोनी यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

भारताने श्रीलंकेच्या या 143 धावांचा पाठलाग 37.1 षटकांमध्ये 4 गडी गमावून केला. यामध्ये सलामीवीर अनुज रावत 50 धावा आणि समीर चौधरी 31 धावा यांचे सर्वाधिक योगदान होते.

संक्षिप्त धावफलक:

श्रीलंका: 38.4 षटकात सर्वबाद 143 धावा (निपुन मलिंगा 38 , अजय देव गौडा 18/3)

भारत: 37.1 षटकात 6 बाद 144 धावा (अनुज रावत 50, एल मानसिंघे 2/32)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

-या बलाढ्य विक्रमासाठी आयसीसीने इंग्लंडला दिल्या शुभेच्छा

-विराट कोहलीला सल्ला देणे माजी भारतीय क्रिकेटपटूला पडले महागात