भारतीय संघाची श्रीलंका कसोटी मालिकेसाठी घोषणा, या मोठ्या खेळाडूचे पुनरागमन !

आज बीसीसीआय निवड समितीने पुढच्या महिन्यात १६ तारखेपासून श्रीलंका विरुद्ध सुरु होणाऱ्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेपैकी २ सामन्यांसाठी संघाची निवड केली आहे. भारतीय संघात सलामीवीर मुरली विजयचे पुनरागमन झाले आहे.

मुरली विजय श्रीलंका दौऱ्यावेळी दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे मार्चनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट पासून दूर आहे. तो सध्या सुरु असणाऱ्या रणजी सामन्यात तामिळनाडू संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे.

त्याचबरोबर न्यूजीलँड विरुद्ध वनडेत संधी न मिळालेल्या अजिंक्य राहाणेला उपकर्णधारपदी कायम ठेवण्यात आले आहे. तर भारताचे अनुभवी फिरकी गोलंदाज आर. अश्विन आणि रवींद्र जडेजाचीही निवड झाली आहे.

यांच्याबरोबरच वेगवान गोलंदाज इशांत शर्माचेही संघात पुनरागमन झाले आहे. त्याच्याबरोबरच उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी हे वेगवान गोलंदाजही संघात असणार आहे.

संघात समतोल साधण्यासाठी अष्टपैलू हार्दिक पंड्याची निवड झाली आहे.

आता हे बघावं लागेल की जो न्याय कर्णधार विराट कोहलीने शिखर धवनला पुनरागमन करताना न्यूजीलँड विरुद्धच्या वनडे संघात स्थान देताना लावला होता तोच न्याय तो मुरली विजयला लावणार का?

असा आहे भारतीय संघ:
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य राहाणे, रिद्धिमान सहा, इशांत शर्मा, रोहित शर्मा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी,हार्दिक पंड्या,शिखर धवन,मुरली विजय,आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, चेतेश्वर पुजारा, केएल राहुल.